Satara जिल्हा बँकेची ही निवडणूक केवळ संचालक निवडण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. ही निवडणूक राजकारणातील नेतृत्वाची ताकद, सहकारातील पकड आणि आगामी राजकीय वाटचालीची दिशा तपासणारी ठरणार आहे. Satara: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेचा फैसला करण्यासाठी उद्या रविवारी (दि. १) ११ तालुक्यांत मतदानाची रणधुमाळी रंगणार आहे. सहकार विभागाची संपूर्ण यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली असून, २०२१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.