विशाल गुजर सातारा : खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये उपचारांचे शुल्क तसेच वैद्यकीय सेवा व सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूचनांनुसार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. मात्र, कोरोना काळातही असेच निर्देश देऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे नव्या आदेशानंतर तरी खासगी रुग्णालयांमध्ये दरपत्रके झळकणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे..