सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील चिलारवाडी गावाने अचूक नियोजनाने पाण्याचे दुर्भिक्ष दूर करत राज्याला नवा आदर्श घालून दिला आहे. -सचिन काकडे, सातारा राज्यभर दुष्काळी परिस्थिती आणि तीव्र पाणीटंचाईचे सावट असताना, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील चिलारवाडी गावाने अचूक नियोजनाने पाण्याचे दुर्भिक्ष दूर करत राज्याला नवा आदर्श घालून दिला आहे. पाऊस पडलेला असतानाही, डोंगर माथ्यापासून पायथ्यापर्यंत पाणी जिरवत उभी राहिलेली 'पाणीदार चळवळ' दुष्काळी भागात कशी किमया घडवू शकते, याचा वस्तुपाठ या गावाने घालून दिला आहे.