सातारा : दिवाळीच्या प्रकाशात घराचा प्रत्येक कोपरा उजळावा आणि सजावटीतून सणाचा आनंद खुलावा, यासाठी सातारा शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सजावटीच्या साहित्य खर. पारंपरिक पणत्या, आकाशकंदील आणि फुलांच्या माळांसोबतच रंगीबेरंगी एलईडी दिवे, वॉल हँगिंग लाइट्स, लॅम्प, आकर्षक विद्युत रोषणाईच्या माळा आणि रांगोळी स्टिकर्सना पसंती मिळत आहे. यंदा केवळ घर सजवण्यापुरते मर्यादित न राहता थीमनुसार सजावट करण्याकडेही नागरिकांचा कल दिसून येत आहे..दिवाळीचा सण जवळ आल्याने सजावटीच्या साहित्याच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे.