अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून भारताविरोधात भूमिका घेत आहेत. भारताविरोधात आग ओकताना अनेकदा डोनाल्ड ट्रम्प दिसले. त्यातच आता पुन्हा भारताचे टेन्शन वाढल्याचे बघायला मिळतंय. मात्र, त्यांनी सध्याच्या टॅरिफ लावणार नसल्याचे जाहीर केले. भारतासह चीनवरही अमेरिकेकडून टॅरिफ आकारला जाणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमने एक महत्त्वाची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.