Jailer 2 Box Office Collection: सुपरस्टार रजनीकांत यांच्या जेलर २ चित्रपटाने एक नवा इतिहास रचला आहे. या चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत हे कायमच चर्चेत असतात. नुकताच त्यांचा ‘जेलर २’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 18 दिवस उलटले आहेत तरी देखील कमाईच्याबाबतीत सिनेमा नव्या चित्रपटांना देखील टक्कर देताना दिसत आहे. दररोज चित्रपटाच्या कमाईत वाढ होताना दिसत आहे.