जत : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जत तालुक्यातील अ वर्ग सोसायटी गटातील मतदान प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उमेदवार विनोद पवार यां. उमेदवार विनोद पवार यांनी मतदान प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेत गुप्त मतदान पद्धतीचा भंग झाल्याचा आरोप केला आहे. मतदारांवर प्रचंड दबाव टाकण्यात आला असून, सुमारे १५ ते २० मतदारांनी उमेदवारांसमोर उघडपणे मतदान केल्याचा दावा त्यांनी केला.