सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी जिल्ह्यात अत्यंत चुरशीच्या आणि ईर्षेच्या वातावरणात ९३.९१ टक्के मतदान. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता निकालाकडे लागले असून आघाडीसह भाजपच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे..सकाळपासूनच सर्वच केंद्रांवर मतदारांचा मोठा उत्साह दिसून आला. कडेगाव केंद्रावर सर्वाधिक ९९.३८ टक्के मतदानाची नोंद झाली, तर सांगली केंद्रावर सर्वांत कमी ८४.५८ टक्के मतदान झाले.