ईश्वरपूर : घटस्फोट व पोटगीसाठी २० लाख रुपयांची मागणी करून बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकीच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याने जीवन संपविल्याचा धक्का. सासऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सुनेसह तिघांवर ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. .सून संजना अविनाश पवार ( वय १९), संजना हिचे वडील अविनाश ज्ञानदेव पवार ( ४५, दोघे रा. पलूस) , मावशी स्नेहल प्रवीण गलांडे (३३, रा. पलूस) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.