सांगली : शहरातील दत्त-मारुती रस्त्यावर दुकानासमोरील मंडपाचे अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाशी वाद घालून सहायक आयुक्तांवर पेट्रोल ओतल्याप्रकरणी. दिनेश गोविंदराव तनवानी असे व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत सहायक आयुक्त सचिन सागावकर यांनी फिर्याद दिली आहे..दत्त-मारुती रस्त्यावर दुकानांसमोर पाच फूट अंतरात तात्पुरते स्टॉल उभारण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. मात्र, स्टॉलवर मंडप किंवा शेड उभारण्यास महापालिकेने मनाई केली होती. तरीही काही व्यापाऱ्यांनी मंडप उभारल्याचे निदर्शनास येताच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शनिवारी सकाळी कारवाईचा बडगा उगारला.