मोहोळ : मोहोळजवळील महामार्गावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे दुधाचा टँकर उलटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सर्व्हिस र. मात्र, सर्व्हिस रस्त्याची झालेली दुरवस्था आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे..मोहोळ सोलापूर महामार्गावर मोहोळ परिसरातील सर्व्हिस रस्त्याबरोबरच मुख्य रस्त्यावर ही मोठमोठे खड्डे पडले असून, त्यातून वाहनांची वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. संबंधित रस्त्यावरून दररोज दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते.