रामा : आरं, तू त्यो राज कपूरचा पिच्चर बघितलायस काय?शिवा : कुठला रं?रामा : आरं, त्योच की! ज्यात आजोबा पृथ्वीराज कपूर, पोरगा राज कपूर आणि नातू रणधीर कपूर... म्हणज. म्हणजे तीन पिढ्यांचा एकाच घरात सिनेमा... कल आज और कल!शिवा : मगं त्याचं काय?रामा : आरं, आक्शी तसंच अंबानींचं बी हाय बघ! आजोबा धीरुभाई, पोरगा मुकेश आणि आता नातवंडं आकाश, अनंत आणि ईशा. तीन पिढ्या झाल्या, धंदा सुसाट हाय गड्यांचा...