राजू शेट्टी यांनी शिरोळ व हातकंणगले तालुक्यातील दत्तवाड, अब्दुललाट, आकिवाट, शिरटी, बुबनाळ, नांदणी, उदगांव, कोथळी, दानोळी, नरंदे, आळते आणि रुई या गावांमध्ये गावभेटी व कोपरा सभा घेतल्या. Raju Shetti: ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे आणि ऊस दराकडे साखर कारखानदार व सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.