Satara Bank Election : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विक्रमी ९७.९२ टक्के मतदान झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीत उतरले असले, तरी अनेक मतदारसंघांत वर्चस्वाची लढाई पाहायला मिळत आहे. मतदानादरम्यान खंडाळ्यात समर्थकांमध्ये झालेली हाणामारी, फलटणमध्ये रामराजे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची झालेली अनपेक्षित भेट, तर माण-पाटणमधील पारंपरिक राजकीय संघर्षाने या निवडणुकीचा रंग अधिकच गडद केला आहे.