मिरज : गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असणारी व प्रतीक्षेत असणारी मुंबई ते बंगळूर स्लीपर ‘वंदे भारती’ची प्रतीक्षा अखेर संपली असून लवकरच मुंबई ते बंगळूर स्लीपर वंद. ही ‘वंदे भारत’ मिरजमार्गे सुरू करणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. विश्वेश्वरय्या टर्मिनल येथे रविवारी त्यांच्या हस्ते बंगळूर ते मुंबई व्हाया सोलापूर स्लीपर वंदे भारत हिरवा झेंडा दाखवून सुरू करण्यात आली. .याचवेळी मिरजमार्गे देखील लवकरच स्लीपर वंदे भारत धावणार असल्याचे त्यांनी घोषणा केली.