संजय गडदे, साम टीव्ही मुंबई: कांदिवली पूर्व परिसरात रस्त्यावर ऑइल सांडल्याने अपघातांची मालिका घडल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रादेशिक पोलीस कार्यालयासमोरील. उत्तर प्रादेशिक पोलीस कार्यालयासमोरील रस्त्यावर तब्बल १४ दुचाकींचे अपघात झाले. रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे दुचाकी घसरून हे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पूर्व येथील उत्तर प्रादेशिक पोलीस कार्यालयासमोरील रस्त्यावर ऑइल सांडले होते. या ऑइलवरून दुचाकी घसरल्याने एकापाठोपाठ एक अपघात घडले.