फोटो-27378 बाभूळगाव : कुलस्वामिनी रेणुकामाता विभागीय शिक्षक पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार किशोर दराडे, सहाय्यक निबंधक अर्चना शिंदे आदी. रेणुकामाता पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सिद्धांत दराडे सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १ : कुलस्वामिनी रेणुकामाता विभागीय शिक्षक शिक्षकेतर सेवकांची पगारदार सहकारी संस्था मर्यादित या पतसंस्थेचे उद्घाटन बाभूळगाव येथे झाले. संस्थेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी सिद्धांत दराडे, उपाध्यक्षपदी सुनील पवार तर कार्यवाहपदी नीलेश शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.