CHM26B03613 वाडी- शेवाडी : वाडी-शेवाडी धरणाच्या अपूर्ण कालव्यांसाठी उपोषणाला बसलेले बबलू कोळी. ------- वाडी- शेवाडी धरणाच्या कालव्यासाठी उपोषण सुरू दहा मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; निधी खर्चाच्या चौकशीची मागणी सकाळ वृत्तसेवा चिमठाणे, ता. १ : बुराई नदीवरील वाडी- शेवाडी (ता. शिंदखेडा) मध्यम प्रकल्प बांधून अनेक वर्षे उलटली तरी डावा व उजवा कालवा अद्याप अपूर्णच आहे. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही कालव्यांची कामे पूर्ण का झाली नाहीत?