३०-२ एमबीबीएस, बीडीएसच्या १३८ रिक्त जागांवर प्रवेश नोंदणीसाठी आज अखेरची मुदत सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ः राज्यातील एमबीबीएस आणि बीडीएस या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेशासाठी रिक्त राहिलेल्या १३८ जागांसाठी विशेष फेरीचे आयोजन केले आहे. या फेरीसाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांना नोंदणीची सोमवार (ता.२) सायंकाळी साडेपाचपर्यंत मुदत दिली आहे. यासंदर्भात जाहीर वेळापत्रकानुसार राज्य कोट्यातील रिक्त जागांसाठी ही प्रक्रिया सुरू आहे.