यंदा मुलांना चॉकलेट फटाक्यांचे आकर्षण! हुबेहूब फटाक्यांचा आकार; खाण्यासाठी योग्य चॉकलेट्सना पसंती. लोगो : आली दिवाळी NSK26H34255; NSK26H34256 जळगाव : दिवाळीनिमित्त बाजारात विक्रीस आलेले फटाक्यांचे चॉकलेट्स. १ : दिवाळी म्हटली की फटाके, फराळ आणि मिठाईची रेलचेल असते. मात्र, यंदा दिवाळीच्या बाजारपेठेत मुलांसाठी दाखल झालेल्या चॉकलेट फटाक्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले आहे. प्रत्यक्ष फटाक्यांसारखा हुबेहूब आकार, आकर्षक रंगसंगती आणि वेगळ्या पॅकिंगमुळे या चॉकलेट्सना मुलांकडून पसंती मिळत आहे.