पुण्यातील दिवाळी कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती, सरकारकडून मिळणारी मदत आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत पुरेशी नसली तरी सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्यातील एका दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पोहोचल्या होत्या. तिथे त्यांनी राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवही भाष्य केलं, मीडियाशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांच्या संबंधी सरकार काम करत असून दुष्काळामध्ये सरकार त्यांच्या पाठीशी आहे. सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जात आहेत.