लातूर जिल्ह्यातील एका भागात एका फ्लॅटवर धाड टाकून पोलिसांनी देहविक्रीच्या एका मोठ्या रॅकेटचा भंडाफोड केला आहे. या प्रकरणात दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात पोलिसांनी देहविक्रीच्या एका मोठ्या रॅकेटचा भंडाफोड केला आहे. तर २१ वर्षांच्या एका तरुणीची सुटका करण्यात आली आहे. या तरुणीला या देहव्यापाऱ्यात जबरदस्तीने ढकलण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. या छाप्याच्या वेळी एक जण घटना स्थळावरून पसार होण्यास यशस्वी झाला आहे.