गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र चर्चेत आलं आहे. 3 हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर 2 ऐवजी 4 शासकीय सदस्य नेमण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाच्या घडामोडींमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या कथित पत्रामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मतदानापूर्वीच हे पत्र समोर आल्याने कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे. गोकुळ दुध संघाच्या घडामोडींमध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे.