राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीसाठी 50 लाख रुपयांचा धनादेश खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे दिला आहे. सदर धनादेश जिल्हाधिकाऱ्याकडे देण्याची सूचना त्यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी 16 तारखेला बारामतीमध्ये येणार आहेत. त्यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे हे आमच्या पक्षाकडून राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडतील. मी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा पाहणी दौरा करत आहे.