Latur Sex Racket Busted: लातूर शहरात पोलिसांनी एका देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली असून, २१ वर्षीय तरुणीची सुटका केली. पोलिसांच्या मते, या तरुणीला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले होते. या प्रकरणातील एक संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.