तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची मंगळवारी (दि. २७) अन्नदान महाप्रसादाने सांगता झाली. उत्सवाच्या प्रारंभाप. उत्सवाच्या प्रारंभापासून मंदिरात विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रम उत्साहात पार पडले. ३ ऑक्टोबर रोजी देवीच्या मंचकी निद्रेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर ११ ऑक्टोबरला घटस्थापना, २० ऑक्टोबरला दसरा आणि २१ ऑक्टोबरला पहाटे पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा पार पडला. २६) रात्री सोलापूरच्या मानाच्या काठ्यांसह देवीची छबिना मिरवणूक काढण्यात आली.