देशभरात अशा प्रकारच्या रॅली होत आहेत. कालच आम्ही उत्तर मुंबईत आमचे खासदार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली दहा-पंधरा हजारांची रॅली काढली. जनतेचा स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कारण नेपाळ, बांगलादेशप्रमाणे या देशात अराजकता निर्माण व्हावी, अशा प्रकारे काही विघातक प्रवृत्ती, शक्ती काम करत आहेत, ज्यांना परदेशातून पाठबळ मिळते. हे थांबले पाहिजे. त्यामुळे जनता रस्त्यावर उतरली आहे.