कडा : आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरात बिबट्याच्या वावराने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात बिबट्या दि. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात बिबट्या दिसत असल्याची चर्चा असून, शेतशिवारात त्याच्या पायांचे ठसे आढळून आल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे. काही शेतकऱ्यांनी बिबट्या प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. .शेतीची कामे करायची कशी आणि जनावरांची देखभाल करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.