लातूर : हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याचा आनंद आणि पोलिसांच्या तत्परतेबद्दल कृतज्ञता, असा अनुभव लातूरमधील ३४ नागरिकांना आला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी तांत्रिक तपा. शिवाजीनगर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या महिनाभरात ३४ हरवलेले मोबाईल शोधून काढले. हे सर्व मोबाईल संबंधित मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले..शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी नागरिकांचे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला.