उमरखेड : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील नांदगव्हाण घाटात रविवारी (दि. १) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास रायपूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या खा. या बसमध्ये सुमारे ३३ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी झाल्याचे समजते. सुदैवाने, मोठी जीवितहानी टळली..पहाटेच्या सुमारास प्रवासी झोपेत असतानाच घाटातील एका वळणावर बसचा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरू करण्यासाठी हालचाली करण्यात आल्या. जखमी प्रवाशांना उपचारासाठी हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.