Pune Metro: पुणेकर आणि आयटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे उद्घाटन ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबरपासून सकाळी ६ वाजल्यापासून सामान्य प्रवाशांसाठी मेट्रो सेवा सुरू होईल. पुण्यातील लाखो आयटी कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची वाट पाहणं आता संपलं आहे. शहरातील सगळ्यात जास्त चर्चेत असलेला हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग अखेर सुरु होतीये.