Pune Crime News : माझ्या पश्चात मुलाला आपली आठवण येईल, म्हणून त्यालाही सोबत नेत असल्याचे महिलेने चिठ्ठीत लिहिले होते. यावेळी तिने जीवन संपवण्यामागील कारणही सांगितलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आई मुलाला १८ व्या मजल्यावर घेऊन जाताना दिसली होती. पोलिसांनी इमारतीमधील ‘सीसीटीव्ही’ फुटेजची पडताळणी केली असता, एकता या मुलगा माधव याला सोबत घेऊन लिफ्टने इमारतीच्या १८ व्या मजल्यावर जाताना दिसल्या. १८ व्या मजल्यावरील गॅलरीजवळ दोघांच्याही चपला आढळल्या महिती आहेत.