Crime News: मृत तरुणाची पत्नी आणि तिच्या दोन कथित प्रियकरांनी मिळून हा काटा काढल्याचे उघड झाले असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हैदराबाद : तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात एका २६ वर्षीय तरुणाची अत्यंत निर्घृण हत्या (Crime News) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला तलावात बुडून झालेला अपघात (Crime News) किंवा संशयास्पद मृत्यू वाटणारी ही घटना प्रत्यक्षात एक पूर्वनियोजित घातपात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.