पुण्याच्या नीरा देवघर धरणातून 750 क्युसेकने नीरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. तीन महिन्यांच्या दुष्काळामुळे पिके करपत असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली होती. या आवर्तनामुळे शेतीला तसेच पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याची सोय होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पावसानं दडी दिल्यामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पुण्यातील भोर तालुक्यात पाऊस नसल्याने ओढे आणि नदीनाले कोरडे पडले होते.