Swapnil Joshi: स्वप्निल जोशीच्या अपघाताची बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. आता स्वतः अभिनेत्याने व्हिडीओच्या माध्यमातून त्याबद्दल खुलासा केला आहे. Swwapnil Joshi: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी याच्या अपघाताची बातमी सोशल मीडियावर पसरल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. अभिनेत्याला गंभीर दुखापत झाल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. अनेक चाहत्यांनी, मित्रमंडळींनी आणि नातेवाईकांनी त्याला फोन करून तब्येतीची विचारपूस केली. अखेर या सर्व चर्चांवर स्वप्नील जोशीने स्वतः मौन सोडलं आहे.