प्रदीप पुरणेकर प्रकरणी राम पुरणेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत पुरणेकर यांनी मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी पुरणेकर कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. राम पुरणेकर पोलिसांना योग्य पुरावे सादर करणार असून, मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीकडे लक्ष लागले आहे. ठाण्यातील प्रदीप पुरणेकर प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे.