जत : जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या पथकाला जत तालुक्यातील उमराणी येथे स्थानिकांच्या तीव्र विरोधाचा सामन. बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर तपासणी सुरू असताना काही ग्रामस्थांनी गोंधळ घालून अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. तसेच वाहनासमोर दगड ठेवून अडथळा निर्माण केल्यामुळे आरोग्य पथकाला कारवाई अर्धवट सोडून परतावे लागले. पोलिसांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने शासकीय कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे..