मृणाल वष्ट सांगली : गतवर्षीपर्यंत चकली भाजणी, चिवडा मसाला, अनारसे पीठ... अशी कमी वेळेत पदार्थ तयार होणारी सामग्री घेऊन दिवाळी साजरी होत होती. यंदा मात्र तयार फर. यंदा मात्र तयार फराळ खरेदीवर गृहिणींचा भर आहे. शहरात सुमारे ५०० ठिकाणी तयार फराळाची निर्मिती होत असून यानिमित्ताने सुमारे एक हजार महिलांचे हात फराळ निर्मितीत गुंतले आहेत. त्यांच्याकडून दसऱ्यापासूनच कच्चा माल आणून तो निवडून, पीठ करून पूर्वतयारी सुरू आहे. .