महिलेच्या घरात घुसून विनयभंग, मारहाण आणि पोक्सो कायद्यांतर्गत वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर सोलापूर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल. Sushil Karad. महिलेच्या घरात घुसून विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि त्याच्या साथीदारांवर सोलापुरात १४ कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर, 1 नोव्हेंबर: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तुरुंगात असलेला आरोपी वाल्मिक कराड याच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे.