वारणानगर : जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथील ऊस भरून गळीतासाठी वारणा साखर कारखान्याकडे आलेला ट्रॅक्टर कारखान्याच्या गाडी अड्ड्याजवळ आला असता चालक शामराव आनंदा ध. जुने पारगाव) यांना चक्कर आल्याने ते खाली पडले. यावेळी ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना दुपारी वारणा मुद्रणालयासमोर घडली.