Thane BJP Rally: या पदयात्रेच्या निमित्ताने पूर्णेकर हत्या प्रकरणावरून कोणते राजकारण रंगते, याकडे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी, ठाणे: समाजात वाढत चाललेल्या अराजकतेच्या निषेधार्थ ठाणे शहर जिल्हा भाजपच्या वतीने आज, रविवारी सकाळी ९ वाजता ‘लोकतंत्र बचाव पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्यासह महायुतीचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत.