Maharashtra Drought: केंद्राकडे पाठवायचा प्रस्ताव ३५ ते ४० हजार कोटी रुपयांपर्यंत असेल असे आधी म्हटले गेले होते. मुंबई : दुष्काळ निवारणासाठी सुमारे ३१ हजार कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारने द्यावी, असा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाने तयार केला आहे. रब्बी हंगामातील मदतीसाठी स्वतंत्र प्रस्ताव नंतर पाठविला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.केंद्राकडे पाठवायचा प्रस्ताव ३५ ते ४० हजार कोटी रुपयांपर्यंत असेल असे आधी म्हटले गेले होते.