मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी वाढ झाली. मुंबई : आधीच वाढत्या महागाईच्या झळा सोसणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला आणखी एक कात्री लागणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने मुंबई आणि लगतच्या परिसरात सीएनजी दरात प्रतिकिलो एक रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीमुळे मुंबई आणि महानगर प्रदेशात सीएनजीचा नवा दर प्रतिकिलो ९० रुपये इतका झाला आहे. हे नवे दर ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून (१ नोव्हेंबरच्या पहाटेपासून) लागू झाले आहेत.