सातारा : ‘तुमचा १ हजार ७०० कोटींच्या बँक घोटाळ्याशी संबंध आहे... तुमच्या खात्यात ४० कोटी रुपये जमा झाले आहेत...’ अशा धक्कादायक दाव्यांनी ७१ वर्षीय वृद्धाला भीती. मुंबईतील अँटी करप्शन ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून व्हॉटस्ॲप कॉल आणि व्हिडीओ कॉलद्वारे डिजिटल अरेस्टचा बनाव केला. .रिझर्व्ह बँकेच्या पडताळणीचे कारण सांगत वृद्धाकडून विविध बँक खात्यांवर पैसे जमा करून घेतले. १५ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत हा प्रकार घडला.