लोणंद : नीरा-लोणंद मार्गावरील बाळूपाटलाचीवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील रेल्वे पुलावर ईकोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात संतोष भरत धोत्रे (वय २७. लोणंद) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी नेहा संतोष धोत्रे (२३) गंभीर जखमी झाल्या. हा अपघात शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडला..संतोष धोत्रे व त्यांची पत्नी नेहा हे दोघे आपल्या दुचाकीवरून नीरा येथून लोणंदच्या दिशेने येत होते.