Discover how excessive police security measures at Nashik's Kumbh Mela sparked outrage among citizens, leading to massive protests and impacting the grand ceremony experience. पास असूनही हुज्जत; नागरिकांशी अरेरावी ध्वजारोहण, गोदाआरतीला पोलिसांचा सुरक्षेच्या नावाखाली अतिरेक सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.३१ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण आणि गोदाआरती सोहळ्याला पोलिसांच्या अवाजवी सुरक्षेचा मोठा फटका नागरिकांना बसला. ‘तगडा बंदोबस्त’ ठेवण्याच्या नावाखाली पोलिसांनी राबविलेल्या कडक धोरणामुळे संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.