Evergreen Hindi Songs: ६० वर्षांपूर्वीचं लतादीदींचं ते गाणं आजही घराघरांत गुंजत आहे. तीन पिढ्यांच्या मनावर कायम अधिराज्य करत आहे. ६० वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात गायलेले 'बता दूँ क्या लाना तुम लौट के' हे अजरामर गाणे आजही तितकेच प्रभावी आहे. हे सदाबहार गीत आजही अनेक घरांमध्ये ऐकायला मिळते. अनेकदा पत्नी आपल्या पतीकडे हे गाणे ऐकण्याची किंवा गुणगुणण्याची फर्माइश करतात.