डॉ. इब्राहिम पटेल यांना ५,००० हून अधिक ओपन हार्ट सर्जरींचा अनुभव आहे. ते मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी, बायपास सर्जरी, हृदयाच्या झडपांच्या शस्त्रक्रिया तसेच मुलांमधील जन्मजात हृदयविकारांच्या उपचारांमध्ये कार्यरत आहेत. रोबोटिक हार्ट सर्जरीच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे, भारतातील रोबोटिक कार्डियाक सर्जन्सपैकी ते एक आहेत. पटेल यांचा सामाजिक कार्यातही सहभाग आहे. त्यांच्या एकूण शस्त्रक्रियांपैकी सुमारे ३० टक्के शस्त्रक्रिया गरजू रुग्णांसाठी विनामूल्य केल्या जातात.