Dombivli Water Supplyडोंबिवली : डोंबिवलीकरांसाठी एक महत्त्वाची खबर असून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून डोंबिवली पूर्व विभागाचा पाणीपुरवठ. नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून डोंबिवलीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला खंबाळपाडा परिवहन आगाराजवळ मोठी गळती लागली आहे. .ही गळती थांबविण्यासाठी तातडीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीकडून देण्यात आली आहे.