Pune Crime News : माझ्या पश्चात मुलाला आपली आठवण येईल, म्हणून त्यालाही सोबत नेत असल्याचे महिलेने चिठ्ठीत लिहिले होते. यावेळी तिने जीवन संपवण्यामागील कारणही सांगितलं आहे. पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) डांगे चौक परिसरात आईनं आपल्या मुलासह इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये १८ व्या मजल्यावरून उडी मारुन आई आणि सहा वर्षांच्या मुलाने जीवन संपवलं.